IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत या पदासाठी निघाली नवीन भरती,अर्ज प्रक्रिया सुरू

IPPB Recruitment 2024 : भारतीय पोस्ट खात्यात नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे, भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक येथे काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्षे व जास्तीत जास्त 55 वर्ष असणार आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया महाव्यवस्थापक वित्त/ मुख्य वित्त अधिकारी या पदासाठी होणार असून उमेदवाराला दरमहा पगार 3 लाख 27 हजार ते 3 लाख 70 हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहे.यामध्ये शैक्षणिक पात्रता आयसीएआय येथील चार्टर्ड अकाउंटंट पदवी असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 4 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी करणे आवश्यक आहे, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (IPPB Recruitment 2024)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार India Post Payments Bank यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment