भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेत 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी ! ISRO Recruitment

ISRO Recruitment : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रोमध्ये) विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटी पूर्ण करत असल्यास खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 21700 ते 69100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.यासाठी उमेदवाराचे वय  18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे यामध्ये एससी/एसटी 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया 54 रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये तंत्रज्ञ-बी (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक,इलेक्ट्रिकल,इन्स्ट्रुमेंट,मेकॅनिक, फोटोग्राफी,डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर) इत्यादी पदांचा समावेश असणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 09 डिसेंबर 2023 पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क 500 रुपये आकरण्यात आलेले आहे, तर उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी द्वारे होणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ISRO Recruitment)

  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने जसे की पोस्टाने किंवा कुरिअरने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • तसेच 31 डिसेंबर 2023 नंतर आलेले अर्ज रद्द केले जातील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकारी ISRO कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

7 thoughts on “भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेत 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी ! ISRO Recruitment”

Leave a Comment