BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत फक्त 4 थी पासवर सफाई कामगार पदांसाठी नवीन भरती सुरु

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार (Sweeper) पदासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 22 वर्षे व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, यामध्ये उमेदवाराचे शिक्षण चौथी पास असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्ज 26 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एच/पश्चिम विभाग, तळमजला, दुसरी हसनाबाद लेन, खार प, मुंबई- 400052 या पत्त्यावर सादर करायचे आहेत. उमेदवारांनी अर्जसोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीच्या जाहिराती प्रकाशित केल्या जातात, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलीक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करिता सफाई कामगार ही पदे भरायचे आहेत.

सफाई कामगारांचे 4 पदे रिक्त आहे असे महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलीक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे भरायचे आहेत (BMC Bharti 2024) ही पदे भरण्यासाठी स्थानिक शासकीय संस्थेकडून ही निविदा मागवण्यात येत आहे.

ही भरती प्रक्रिया सफाई कामगार या पदाकरिता होणार असून,भरतीचे इतर सर्व अधिकार मुंबई महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment