Malegaon Mahanagarpalika Recruitment : मालेगाव महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स व इतर पदांकरिता भरती सुरू

Malegaon Mahanagarpalika Recruitment : मालेगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार 17000 ते 20000 पर्यंत पदांनुसार देण्यात येणार आहे, यासाठी नोकरीचे ठिकाण मालेगाव, नाशिक असणार आहे उमेदवाराने ऑफलाइन अर्ज 20 डिसेंबर 2023 ते 29 डिसेंबर 2023 पर्यंत आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

स्टाफ नर्स व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरिता ही भरती होणार असून यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 43 वर्षापर्यंत असावे. उमेदवाराने खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये तर राखी प्रवर्गासाठी 100 रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे,(Malegaon Municipal Corporation) यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असून उमेदवाराने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी. यासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Malegaon Mahanagarpalika Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Malegaon Mahanagarpalika कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment