Income Tax Mumbai Recruitment : आयकर विभाग मुंबई येथे 10 वी ते पदवीधरांना 291 जागांवर नोकरीचा गोल्डन चान्स

Income Tax Mumbai Recruitment : आयकर विभाग मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया एकूण 291 रिक्त जागांवर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी उत्तीर्ण ते पदवीधर पर्यंत असणे आवश्यक आहे तसेच संबंधित क्रीडा पात्रता देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे.

यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून उमेदवारांना दरमहा पगार कमीत कमी 18000 ते 1,42,400 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स,स्टेनोग्राफर,टॅक्स असिस्टंट,पदवीधर,मल्टी टास्किंग स्टाफ (MTS),कॅन्टीन अटेंडंट इत्यादी पदांवर होणार असून उमेदवारांनी अर्ज 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्ष असणे आवश्यक आहे, यामध्ये ओबीसी उमेदवारांना पाच वर्ष तर SC/ST उमेदवारांना 10 वर्षाची शिथिलता देखील देण्यात आलेली आहे.

उमेदवारांना अर्ज शुल्क 200 रुपये भरायचे आहे तसेच क्रीडा पात्रता राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू आवश्यक आहे (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Income Tax Mumbai Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Income Tax Department कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment