Northern Railway Bharti 2023 : उत्तर रेल्वेत 10 वी/ITI पासवर तब्बल 3051 जागांसाठी मेगा भरती सुरू

Northern Railway Bharti 2023 : उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 3,051 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 11 डिसेंबर 2023 पासून ते 11 जानेवारी 2024 पर्यंत पदानुसार अर्ज सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया 3051 रिक्त जागांसाठी होणार असून (Railway Recruitment) या भरती प्रक्रियेसाठी 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच भारत सरकार मान्यताप्राप्त NCVT /SCVT द्वारे मान्यताप्राप्त संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी कमीत कमी 15 वर्षे व जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. Railway Jobs यामध्ये एससी/एसटी व ओबीसी उमेदवारांना 03 ते 05 वर्षाची शिथिलता देखील देण्यात आलेली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी जनरल/ओबीसी उमेदवारांना 100 रुपये तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी व महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Northern Railway Bharti 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • पोस्टाने/कुरिअरने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Northern Railway कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment