ST Corporation Yojana : एसटी महामंडळाची नवीन योजना, आता संपूर्ण महाराष्ट्रभर कोठेही फिरा फक्त 1100 रुपयांत

ST Corporation Yojana : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आवडेल तेथे कुठेही प्रवास करण्याची योजना सन 1988 पासून चालू केली आहे या योजनेच्या अंतर्गत 7 दिवसाचा आणि 4 दिवसाचा पास दिला जातो आणि या पासची किंमत हे 585 रुपये पासून 3030 रुपये पर्यंत असते.

या योजनांमध्ये तुम्ही साधी, जलद, रात्र सेवा शहरी व यशवंती या महाराष्ट्र राज्यातील बससह तुम्ही प्रवास करू शकता तसेच शिवशाहीमध्ये सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता या योजनेचे काही नियम आहेत त्या नियमांमध्ये सात दिवस व चार दिवसाचे पास तुम्हाला दिले जातात.

साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या सेवेसाठी असणारे ज्यामध्ये साधी, जलद,रातराणी, शहरी, यशवंती या आंतरराज्य मार्गामध्ये चालणाऱ्या गाड्या चा समावेश असतो. निम आराम बससाठी स्वातंत्र्य दर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने निश्चित केले आहेत.

फक्त अकराशे रुपयात महाराष्ट्रभर एसटी प्रवास करण्यासाठी येथे क्लिक करा

शिवशाही बससाठी देण्यात येणारा पास हा शिवशाही बसेस साधी, निम आराम, विनावातानुकूलित या सर्व सेवांसाठी आंतरराज्य म्हणजे फक्त महाराष्ट्र करिता ग्राह्य असणार आहे, दहा दिवस अगोदर हे पास दिले जातात, त्यासाठी तुम्हाला फिरण्याच्या दहा दिवस अगोदर या पास साठी अर्ज करावा लागतो.

आवडेल तेथे कुठेही प्रवास (MSRTC Aavdel Tithe Pravas Yojana 2023) या योजनेचा पास नियमित बसेस सोबत कोणत्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणारे यात्रा बसमध्ये सुद्धा ग्राह्य असतात त्यामुळे तुम्हाला जिथे फिरायचं आहे तिथे तुम्ही फिरू शकता प्रवास करणाऱ्या पास धारकांसाठी पास धारक आहेत म्हणून प्रवेश नाकारू नये असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने स्पष्ट लिहिलेला आहे.

जर तुम्हाला आरक्षित जागा पाहिजे असेल तर त्याची वेगळी रक्कम भरून तुम्ही ती जागा तुमची सीट आरक्षित करू शकणार आहात ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित प्रवास करता येईल हा पास अ हस्तांतरणीय म्हणजे कोणाला देता येणार नाही तो पास फक्त तुम्हाला वापरायचा आहे पासचा जर गैरवापर झाला तसा निदर्शनास आलं तर तो पास तुमचा जप्त करण्यात येतो.

आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रवासामध्ये कोणती वस्तू जर तुम्ही घेऊन जात असाल तर किंवा त्या वस्तूचं नुकसान झालं तर यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहेत महामंडळ त्याच्यासाठी जबाबदार राहणार नाही, आवडेल तेथे प्रवास चा पास जर तुम्हाला काढायचा असेल तर त्या पासमध्ये दिवसाची गणना हे रात्री बारापासून ते दुपारी बारापर्यंत अशी करण्यात येते आणि पासच्या मदतीचे शेवटच्या दिवशी प्रवासी सदर म्हणजे त्यापासावर बारा वाजेनंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तुम्हाला तिकीट घेणे बंधनकारक असणार आहे.

काही वेळेस राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या बसेस उशिरा सुटल्यामुळे, मार्गामध्येच बिघडल्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर बस वेळेवर पोहोचत नसेल आणि तुमचा कालावधी जर निघून जात असेल आणि ती बस नंतर पोहोचत असेल तर पासचा प्रवास खंडित झाला नसेल तर पासधारकांकडून तिकीट मूल्य आकारला जाऊ नये असं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सांगितला आहे.

तुमच्या जवळचा कोणत्याही बस स्टॉप मध्ये एसटी स्टँड मध्ये जाऊन काढू शकता या संदर्भाची माहिती तुम्ही वर दिलेल्या लिंक वरून पाहू शकता.

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment