Latur Mahanagarpalika Bharti 2023 : लातूर महानगरपालिकेत दहावी-बारावी ते पदवीधारकांना नोकरीचा गोल्डन चान्स ! विविध पदांवर बंपर भरती सुरू

Latur Mahanagarpalika Bharti 2023 : लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया एकूण 17 संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे.

यासाठी दहावी ते बारावी पास तसेच पदवीधारक/डिप्लोमा धारक उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया लातूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क मधील 17 संवर्गातील रिक्त असणारी 80 पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी होणार असून यासाठी उमेदवाराने दिनांक 22 डिसेंबर 2023 पासून ते 14 जानेवारी 2024 पर्यंत रात्री 11.55 मिनिटापर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया पर्यावरण संवर्धन अधिकारी,सिस्टीम मॅनेजर इ प्रशासन,वैद्यकीय अधीक्षक,शाखा अभियंता स्थापत्य,विधी अधिकारी, अग्निशमन केंद्र अधिकारी,कनिष्ठ अभियंता स्थापत्य,कनिष्ठ अभियंता (पा/पु),कनिष्ठ अभियंता,यांत्रिकी,कर अधीक्षक,औषधनिर्माता Pharmacist,सहायक कर अधीक्षक,कर निरीक्षक,चालक यंत्र, चालक,लिपिक,टंकलेखक,फायरमन,वोल्वमॅन इत्यादी पदांवर होणार असून यामध्ये उमेदवाराला पगार हा पदानुसार वेगवेगळा दिला जाणार आहे.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत असावे, यामध्ये नोकरीचे ठिकाण लातूर असून उमेदवाराला पगार हा कमीत कमी 15000 ते 1,77,500 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Latur Mahanagarpalika Bharti 2023)

  • उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी बारावी ते पदवीधर पर्यंत शिक्षण असावे तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment