Maha Food Recruitment 2023 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी बंपर भरती सुरू

Maha Food Recruitment 2023 : अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभागात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया महाराष्ट्राच्या सर्व 6 विभागांमध्ये राबविण्यात येणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीतर्फे राबविण्यात येत असून यासाठी 345 रिक्त जागा भरायच्या आहेत,(Maha Food Bharti 2023) ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत असून यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 25500 ते 92300 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

या प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 13 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया पुरवठा निरीक्षक व उच्च स्तर लिपिक या पदाकरिता होणार असून यामध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे, उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी भरती प्रक्रियेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व अंकगणित या सर्व विषयांची मिळून 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे, यासाठी उमेदवाराला कमीत कमी 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.

या परीक्षेसाठी अराखीव प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे, उमेदवाराकडे MSCIT प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. MSCIT प्रमाणपत्र नसल्यास नियुक्तीनंतर दोन वर्षात ते सादर करणे बंधनकारक राहील.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Maha Food Recruitment 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment