आर्मी पब्लिक स्कूल कामठी मध्ये विविध पदांवर थेट मुलाखतीद्वारे भरतीची उद्या शेवटची संधी | Army Public School Kamptee Recruitment

Army Public School Kamptee Recruitment : आर्मी पब्लिक स्कूल कामठी मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी 20 डिसेंबर 2023 रोजी उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवाराने द मॉल रोड, कॅम्पटी कॅन्ट. कॅम्पटी-441001 या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया 25 जागांसाठी होणार असून यामध्ये नोकरीचे ठिकाण कामठी,नागपूर असणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 57 वर्षापर्यंत असावे, ही भरती PGTs (भौतिकशास्त्र, जीवशास्त्र), TGTs (विज्ञान, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, संगणक विज्ञान/IP), PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, संगीत, नृत्य, ग्रंथपाल, विज्ञान प्रयोगशाळा परिचर, JCO प्रशासन, LDC इत्यादी पदांवर होणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Army Public School Kamptee Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Army Public School Kamptee कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment