BMC Bharti : मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी 12 वी ते पदवीधारकांना नोकरीचा गोल्डन चान्स !

BMC Bharti : मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया 58 रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा कमीत कमी 15500 ते 60000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.(NHM Mumbai Recruitment)ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकळी (पू), मुंबई 400012 या पत्त्यावर 26 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया वैद्यकीय अधिकारी,वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी,सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ,वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक, सांख्यिकी सहाय्यक,टी. बी. हेल्थ व्हीजीटर,औषधनिर्माता,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,पी.पी.ए म. समन्वयक,समुपदेशक,वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक,वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ,वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक इत्यादी पदांवर होणार असून यामध्ये 58 रिक्त जागा भरायचे आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (BMC Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  • अर्धवट तसेच अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज नाकारण्यात येतील, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment