वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती ; परीक्षा नाही थेट निवड | VVCMC Bharti 2023

VVCMC Bharti 2023 : वसई विरार शहर महानगरपालिका (Vasai Virar Municipal Corporation Recruitment) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

तर काही पदांकरिता थेट मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार 18700 ते 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 60 ते 79 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे,(NUHM Vasai Virar Bharti 2024) ही भरती प्रक्रिया बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी(एमबीबीएस) तसेच फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ इत्यादी पदांकरिता होणार आहे.

यामध्ये बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी या पदांकरिता उमेदवारांनी 20 डिसेंबर 2023 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, बाजार वॉर्ड, विरार (पू.) येथे सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

तर औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञान या पदाकरिता उमेदवारांनी २० डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर २०२३ रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत (शासकीय सुट्टी वगळून) वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पू) येथे अर्ज सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (VVCMC Bharti 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी पदानुसार दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत.
  • अर्जामध्ये स्वतःचा वैध ई-मेल आयडी तसेच सद्यस्थितीत चालू असलेला भ्रमणध्वनी क्रमांक अचूक नोंदवायचा आहे.
  • अर्जदारांनी आपला सध्याचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता अर्जामध्ये नमूद करावा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची वेळेस उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर केली जाईल.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही, तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment