Patbandhare Vibhag Recruitment : पाटबंधारे विभाग “या” पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध; येथे करा अर्ज

Kolhapur Patbandhare Vibhag Recruitment : कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर मध्ये काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने 19 डिसेंबर 2023 ते 29 डिसेंबर 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असणार आहे, उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर- 416003 या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

ही भरती कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाकरिता होणार असून (Patbandhare Vibhag Recruitment) यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे, यामध्ये उमेदवाराची निवड ही टेस्ट तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी असदर नेमणुकीचेदिलेले तारखेपर्यंत सादर करायचे आहेत दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • अर्जाच्या पाकिटावर सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांची करार पद्धतीने कनिष्ठ अभियंता या पदावर नेमणूक करणे बाबत असे स्पष्ट लिहिण्यात यावे.
  • अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • सदर नेमणूक/नियुक्ती समितीमार्फत मुलाखतीद्वारे करण्यात येतील व सदर नेमणुकीचे आदेश हे सक्षम स्तरावरील अंतिम मान्यतेनंतर निर्गमित करण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/ चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केले जाईल.

 

नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment