जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांवर भरती सुरू; पगार 45000 I Jilhadhikari Karyalaya Mumbai Recruitment

Jilhadhikari Karyalaya Mumbai Recruitment : जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात खाली दिलेल्या पत्त्यावर 07 डिसेंबर 2023 ते 27 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार 45000 पर्यंत दिला जाणार आहे, यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज जिल्हा दंडाधिकारी आणि अध्यक्ष जिल्हा गृहनिर्माण समिती, मुंबई शहर, जुने कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001 या पत्त्यावर 27 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती District Disaster Management Officer (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी) या पदाकरिता होणार असून यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक तसेच आपत्ती व्यवस्थापनातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांची निवड जिल्हा निवड समितीच्या अखत्यारीत राहील. जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा हे नियुक्ती प्राधिकारी असतील.

उमेदवारांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला,पदवी/पदव्युत्तर प्रमाणपत्र,मान्यता प्राप्त विद्यापीठाची सामाजिक शास्त्रे किंवा आपत्ती व्यवस्थापन पदवी,आपत्ती व्यवस्थापन अनुभवाची प्रमाणपत्रे इत्यादी बाबींच्या साक्षांकित प्रति पुरवा म्हणून अर्जासोबत सादर करायचे आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Jilhadhikari Karyalaya Mumbai Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज विहित नमुन्यात सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, पत्रव्यवहाराचा पत्ता, शैक्षणिक अर्हता इत्यादी व्यवस्थित नमूद करायची आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment