Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 : सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन भरतीला सुरुवात ; पगार 25500 ते 38600

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने 10 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत पदानुसार सादर करायचे आहेत.

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे, यासाठी नोकरीचे ठिकाण सोलापूर असून उमेदवाराला दरमहा पगार 25500 ते 38600 पर्यंत दिला जाणार आहे.

या भरतीसाठी 76 रिक्त जागा भरायच्या असून यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य), केमिस्ट, फिल्टर इन्स्पेक्टर इत्यादी पदांचा समावेश असणार आहे.

यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असल्याने उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी, उमेदवारांना परीक्षा शुल्क मागासवर्गीयांसाठी 900 रुपये व अमागास प्रवर्गासाठी 1000 रुपये आकारण्यात आलेले आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Solapur Mahanagarpalika Recruitment 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार सोलापूर महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment