UIIC Recruitment 2023 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.अंतर्गत विविध पदांसाठी 300 जागांवर भरती सुरु

UIIC Recruitment 2023 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 16 डिसेंबर 2023 ते 06 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये उमेदवारांना SC/ST 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 22405 ते 62265 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

तसेच भरती करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2023 रोजी कमीत कमी 21 वर्षे ते जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे.(UIIC Bharti 2024) ही भरती प्रक्रिया एकूण 300 रिक्त जागांसाठी होणार असून सहाय्यक पदाकरिता ही भरती राबवण्यात येत आहे.

या प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क अमागास प्रवर्ग 1000 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये आकरण्यात आलेले आहे, उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या लिंकवरून करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज 16 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2024 आहे

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (UIIC Recruitment 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत ऑफलाईन आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment