PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन भरतीला सुरुवात ; 75000 मिळेल पगार

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 12 डिसेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 पर्यंत पदानुसार सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार 75000 रुपये देण्यात येणार आहे, यासाठी नोकरीचे ठिकाण पिंपरी, पुणे असणार आहे. यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

या भरतीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे, उमेदवारांनी अर्जसोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक पात्रता,जातीचे प्रमाणपत्र, एम एम सी रजिस्ट्रेशन व अनुभवाबाबतच्या आवश्यक त्या मूळ प्रती व साक्षांकित केलेल्या सत्यप्रती व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया 64 रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ. इत्यादी पदांचा समावेश असणार आहे उमेदवारांनी अर्ज 20 डिसेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्जाच्या विहित नमुन्यात सादर करायचे आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (PCMC Recruitment 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पदानुसार वर दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार Pimpri Chinchwad Municipal Corporation कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी विविध नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • ज्या उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी एका संवर्गात अर्ज पूर्णपणे भरून पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करायचे आहे, नव्याने रजिस्ट्रेशन करताना ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक वापरावा.
  • कागदपत्रे तपासणी, मुलाखतीस येण्या जाण्याकरिता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • अर्जासोबत सादर केलेला अनुभवाचा दाखला खोटा असल्याचे निदर्शनास आल्यास तो अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment