Pune Mahanagarpalika Bharti : पुणे महानगरपालिकेत साक्षर,12 वी पास ते पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स !

Pune Mahanagarpalika Bharti : पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया वेगवेगळ्या पदांसाठी असून यामध्ये साक्षर (लिहिता वाचता येणारे) उमेदवार तसेच 12 वी पास, मराठी-इंग्रजी टायपिंग, MSCIT उत्तीर्ण व पदवीधर पर्यंत उमेदवार वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत.

उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास पदानुसार अर्ज सादर करायचे आहेत, पदानुसार अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

उमेदवारांनी अर्ज 14 डिसेंबर 2023 पासून ते 26 डिसेंबर 2023 पर्यंत (कार्यालयीन सुट्ट्या वगळून) सकाळी 11 ते दुपारी 2.00 या वेळेत एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11 येथे विहित नमुन्यात सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील (PMC Bharti)

फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, बायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक, फ्रिज एसी दुरुस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक, ब्युटीपार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर, Linux (Redhat) प्रशिक्षक, संगणक बेसिक प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र), एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र – कार्यालयीन सहाय्यक, प्रशिक्षण केंद्र-स्वच्छता स्वयंसेयक

ही भरती 42 रिक्त जागांसाठी वेगवेगळ्या पदांवर होणार असून यासाठी उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर 26 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 58 वर्षापर्यंत असावे.

अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्म तारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालांत परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची स्वयंसाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे (pune municipal corporation)

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक पात्रतेचे दाखले
  • अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडायचे आहेत.

उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह वर दिलेल्या पत्त्यावर दिनांक 14 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 पर्यंत स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करायचे आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Pune Mahanagarpalika Bharti)

  • उपरोक्त कागदपत्रांच्या मूळ प्रती निवड झालेल्या उमेदवारांनी रुजू होताना दाखविणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारक न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार पुणे महानगरपालिके कडे राखून ठेवण्यात आलेले आहे.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment