BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10 वी/12 वी पासवर विविध पदांसाठी बंपर भरती सुरू

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नेहमीच वेगवेगळ्या पदांसाठी भरतीची जाहिरात निघालेली असते, त्याचप्रमाणे आज देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त जागा भरण्यासाठी 10 वी /12वी पास उमेदवारांकरिता ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा वेतन 30000 रुपये दरमहा देण्यात येणार आहे, यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी/बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच शासकीय संस्थेमधून जीएनएम उत्तीर्ण असावे. जीएनएम सर्व वर्षाच्या गुणपत्रिका उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग कौन्सिल येथील नोंदणी प्रमाणपत्र देखील असावे.

या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज 19 डिसेंबर 2023 रोजी कार्यालयीन वेळेत खा.ब.भाभा रुग्णालय, कुर्ला (प) येथील प्रशासकीय कार्यालयातील इमारतीमधील पहिल्या मजल्यावर आवक-जावक विभागात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचा आहे.(सार्वजनिक सुट्ट्या व शनिवार रविवार वगळून)

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया परिचारिका पदासाठी खान बहादुर भाभा रुग्णालय कुर्ला (प) च्या आस्थापनेवर होणार असून यामध्ये 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत,(Brihanmumbai Municipal Corporation) रिक्त पदांची संख्या कमी व अधिक करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकार्‍यांकडे राहील.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (BMC Bharti 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • सदर नियुक्ती ही माननीय सक्षम अधिकाऱ्यांचे पुढील आदेश किंवा सदर पदे नियमित तत्त्वावर भरेपर्यंत यापैकी जे आधी असेल तोपर्यंत तसेच उमेदवाराला महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेचे इतर कोणतेही फायदे असणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

1 thought on “BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10 वी/12 वी पासवर विविध पदांसाठी बंपर भरती सुरू”

Leave a Comment