Thane Mahanagarpalika Recruitment : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांवर नवीन भरती I कोणती परीक्षा नाही; थेट मुलाखत होणार

Thane Mahanagarpalika Recruitment : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने (Thane Municipal Corporation)पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे/प्रमाणपत्रे दोन प्रति मध्ये स्वयंसाक्षांकित करून मुलाखतीच्या वेळी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.

या पदांकरिता उमेदवाराला दरमहा पगार 75000 ते 150000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, पात्र उमेदवारांची मुलाखत 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे येथे होणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया 35 रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये अधिव्याख्याता व वैद्यकीय अधिकारी इत्यादी पदांचा समावेश असणार आहे,(tmc recruitment) यासाठी शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शास्त्रातील पदवी (एमबीबीएस) तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील रजिस्ट्रेशन असणे देखील आवश्यक आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Thane Mahanagarpalika Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  • अर्धवट तसेच अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज नाकारण्यात येतील, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Thane Mahanagarpalika Recruitment : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांवर नवीन भरती I कोणती परीक्षा नाही; थेट मुलाखत होणार”

Leave a Comment