Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti : मीरा भाईंदर महानगरपालिकेत 12 वी पास ते पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी; येथे करा अर्ज

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti : मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या ई-मेलवर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा मानधन 15500 देण्यात येणार आहे, यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असावे, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी उत्तीर्ण असावे तसेच संगणक चालविण्याचे शासनमान्य प्रमाणपत्र असणे आवश्यक जास्तीत जास्त शिक्षण पदवीपर्यंत असावे.

उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रे देखील ई-मेल आयडीवर पीडीएफ स्वरूपात पाठवायचे आहेत, निवड झालेल्या उमेदवार व प्रतीक्षा यादी मधील उमेदवार यांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.निवड झालेल्या उमेदवारांचे मूळ कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती आदेश देण्यात येतील.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता पदासाठी होणार असून उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या ई-मेलवर दिनांक 14 डिसेंबर 2023 ते 23 डिसेंबर 2023 पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खाली दिलेल्या मेल वरून सादर करायचे आहेत.

अर्ज सोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे (Mira-Bhayandar Municipal Corporation)

 • शाळा सोडल्याचा दाखला
 • शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे
 • तांत्रिक अर्हतेची प्रमाणपत्रे
 • संबंधित पदाशी निगडित अनुभव प्रमाणपत्र
 • डोमिसाईल प्रमाणपत्र
 • जातीचे प्रमाणपत्र
 • नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
 • कागदपत्रांची पूर्तता नसेल तर उमेदवार हा अपात्र ठरविण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti)

 • या पदांकरिता उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • उमेदवारास एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास पदनिहाय स्वतंत्र अर्ज वैयक्तिक माहितीसह व त्याच्यासोबत शैक्षणिक पात्रता व इतर नमूद कागदपत्रे विहित नमुन्यात नसलेले/अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • उमेदवाराचा अर्ज अपूर्ण व अर्धवट भरलेला असल्यास नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदार हा उमेदवार राहील.
 • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
 • उमेदवारांनी आपल्या अर्जावर स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला -मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नोंदवायचा आहे.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment