MSC Bank Recruitment : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू; कोणतीही फी नाही

Maharashtra State Co-operative Bank Bharti : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने पोस्टाने अथवा कुरिअरने खाली दिलेल्या पत्त्यावर 27 डिसेंबर 2023 पूर्वी सादर करायचे आहेत.MSC Bank Recruitment

या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 35 वर्षे व जास्तीत जास्त 59 वर्ष असणे आवश्यक आहे.(MSC Bank) यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 62000 ते 90000 पर्यंत पदांनुसार देण्यात येणार आहे.

ही भरती प्रक्रिया 20 जागांसाठी होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे, उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर, एचआरडी अँड एम विभाग, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरसे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई- 400 001 या पत्त्यावर 27 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा -1

ही भरती प्रक्रिया व्यवस्थापक,सहव्यवस्थापक,सहायक व्यवस्थापक,उपमहाव्यवस्थापक इत्यादी पदांवर होणार असून यासाठी उमेदवाराची शिक्षण किमान II वर्ग असलेल्या कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पदवी झालेले असणे आवश्यक आहे,अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/CAIIB ला प्राधान्य दिले जाईल सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा -2

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Maharashtra State Co-operative Bank Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाई.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment