CSIR Bharti 2023 : CSIR मध्ये विविध पदांच्या 444 जागांवर भरती सुरू; इथे करा त्वरित अर्ज

CSIR Bharti 2023 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत 444 जागांसाठी विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने पदानुसार दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून यसाठी उमेदवाराला दरमहा पगार 44900 ते 151100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 33 वर्षापर्यंत असावे.

यामध्ये एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे, परीक्षा शुल्क जनरल/ओबीसी/EWS साठी 500 रुपये आकारण्यात आलेले आहे तर SC/ST/PWD/ExSM/महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.परीक्षा ही फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया सेक्शन ऑफिसर (SO),असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाकरिता होणार असून यामध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने 12 जानेवारी 2024 रोजी 5.00 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (CSIR Bharti 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक करून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment