ESIS Mumbai Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे विविध पदांसाठी भरती सुरू ; पगार 60000 ते 129000

ESIS Mumbai Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्जासह आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

ही भरती विविध पदांवर होणार असून यासाठी उमेदवारांना दरमहा पगार 60000 ते 129000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 67 वर्षापर्यंत असावे (ESIS Recruitment) यामध्ये नोकरीचे ठिकाण मुंबई असून उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी ESIS हॉस्पिटल, वरळी,मुंबई -18 या पत्त्यावर 15 डिसेंबर 2023 रोजी उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये पूर्णवेळ आणि अर्धवेळ तज्ञ, वैद्यकीय अधिकारी इत्यादी पदांचा समावेश असून यासाठी शैक्षणिक पात्रता M.B.B.S. P.G सह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ESIS Mumbai Bharti 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्धवट असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment