PGCIL Recruitment : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ITI पासवर 203 जागांसाठी भरतीची शेवटची संधी

PGCIL Recruitment : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया 203 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी आयटीआय पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, यासाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 18500 ते 74000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून 12 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क जनरल/ओबीसी साठी 200 रुपये तर SC/ST PWD/ExSM साठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही. ही भरती ज्युनियर टेक्निशियन ट्रेनिंग (इलेक्ट्रिकल) या पदाकरिता होणार असून यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आयटीआय (इलेक्ट्रिकल) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत असावे, यामध्ये देखील एससी/एसटी/ओबीसी उमेदवारांना 03 ते 05 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.

ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (PGCIL Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment