Mahatribal Bharti 2023 : आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी मेगा भरती;10 वी ते पदवीधरांसाठी संधी

Mahatribal Bharti 2023 : आदिवासी विकास विभाग (Adivasi Vikas Vibhag Bharti) महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया 602 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता दहावी पास ते पदवीधर पर्यंत असणे आवश्यक आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 19000 व जास्तीत जास्त 1,22,800 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील (Maharashtra Adivasi Vikas Vibhag Bharti)

 • वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक -14
 • संशोधन सहाय्यक – 17
 • उपलेखापाल-मुख्य लिपिक – 30
 • आदिवासी विकास निरिक्षक – 08
 • वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक – 187
 • लघुटंकलेखक – 05
 • गृहपाल (पुरुष) – 43
 • गृहपाल (स्त्री) – 25
 • अधिक्षक (पुरुष) – 26
 • अधिक्षक (स्त्री) – 48
 • ग्रंथपाल – 38
 • प्रयोगशाळा सहाय्यक – 29
 • उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) – 11
 • सहाय्यक ग्रंथपाल – 01
 • उच्च माध्यमिक शिक्षण सेवक -14
 • प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) – 48
 • प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) – 27
 • माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) – 15
 • उच्च श्रेणी लघुलेखक – 03
 • निम्न श्रेणी लघुलेखक – 13
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया नाशिक, ठाणे,अमरावती, नागपूर मध्ये होणार असून उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार/ठिकाणानुसार अर्ज सादर करायचे आहेत. यासाठी अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर मागासवर्गासाठी 900 रुपये आकारण्यात आलेले आहे उमेदवारांनी अर्ज 23 नोव्हेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Mahatribal Bharti 2023)

 • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने जसे की पोस्टाने किंवा कुरिअरने आलेले अर्ज नाकारले जातील.
 • ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून नंतरच अर्ज सादर करावेत.
 • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, भरती संदर्भात इतर सर्व अधिकार आदिवासी विकास विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment