IOCL Recruitment : इंडियन ऑइल मध्ये 1603 जागांसाठी मेगा भरती; ITI /12 वी पासवर नोकरीचा गोल्डन चान्स !

IOCL Recruitment : इंडियन ऑइल मध्ये 1603 जागांसाठी भरतीची नवीन अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे, यासाठी 12 वी+ITI तसेच पदवी पर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी पदानुसार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 16 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात,पदसंख्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही यामध्ये उमेदवारांना पगार हा पदानुसार शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात येणार आहे, उमेदवाराचे वय18 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच यामध्ये एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.

ही भरती ट्रेड अप्रेंटिस तसेच टेक्निशियन अप्रेंटिस पदाकरिता होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतू बारावी उत्तीर्ण/संबंधित क्षेत्रातील पदवीधर/पदविकाधारक,आय.टी.आय असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (IOCL Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत.
  • ऑफलाइन कुरिअरने किंवा पोस्टाने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • भरतीचे तर सर्व अधिकार Indian Oil Corporation Limited कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment