ZP Dharashiv Bharti : जिल्हा परिषद धाराशिव येथे थेट मुलाखती द्वारे मेगा भरती ! 60000 मिळेल पगार

ZP Dharashiv Bharti : जिल्हा परिषद धाराशिव येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेपर्यंत उपस्थित राहायचे आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 60000 व जास्तीत जास्त 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असावे

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया OBGY / स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन / सल्लागार औषध, वैद्यकीय अधिकारी MBBS इत्यादी पदांवर होणार असून यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उमेदवारांनी District Health Officer Office Zilla Parishad Dharashiv. (जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव) या पत्त्यावर प्रत्येक महिन्यातील दिनांक 01 व दिनांक 15 (सदर दिनांक सार्वजनिक सुट्टी वगळून) तारखेस मुलाखत प्रक्रिया घेण्यात येईल, सकाळी 10.00 वाजता माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, धाराशिव येथे उपस्थित राहायचे आहे.

यामध्ये मागासवर्गीयांना वयोमर्यादेमध्ये शिथिलता देखील देण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात अर्जासोबत जोडायचे आहे. उमेदवारांनी डीडी च्या मागे स्वतःचे नाव व पदाचे नाव लिहायचे आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे (ZP Dharashiv Bharti)

 • शैक्षणिक अर्हते बाबतची सर्व प्रमाणपत्रे व सर्व गुणपत्रिका
 • जातीचे प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • अनुभव प्रमाणपत्र
 • आरक्षण प्रमाणपत्र
 • संबंधित महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी प्रमाणपत्र
 • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक प्रमाणपत्र सादर करायचे आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 

 • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही.
 • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 • भरतीचे इतर सर्व अधिकार जिल्हा परिषद धाराशिव कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment