बृहन्मुंबई महानगरपालिकेत फक्त 4 थी पासवर सफाई कामगार पदांसाठी भरती;त्वरित अर्ज करा | Mumbai Mahanagarpalika Bharti

Mumbai Mahanagarpalika Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार (Sweeper) पदासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 11 डिसेंबर 2023 पासून 15 डिसेंबर 2023 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

मूळ जाहिरात आणि अर्ज डाउनलोड करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीच्या जाहिराती प्रकाशित केल्या जातात दिनांक 20 नोव्हेंबरला वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलीक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करिता सफाई कामगार ही पदे भरायचे आहेत.

सफाई कामगारांचे 5 पदे रिक्त आहे असे महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलीक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे भरायचे आहेत हे पदे भरण्यासाठी स्थानिक शासकीय संस्थेकडून ही निविदा मागवण्यात येत आहे.

ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार असून या ऑफलाईन (Mumbai Mahanagarpalika Bharti) पद्धतीने वैद्यकीय आरोग्य अधिकारी, “ए” विभाग, १३४ ई, शाहिद भगतसिंग मार्ग,फोर्ट,मुंबई-400001अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

मूळ जाहिरात आणि अर्ज डाउनलोड करा

मुलाखत झाल्यास उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही (Brihanmumbai Municipal Corporation) त्यांना स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन नियुक्ती करण्यात येईल.

ही भरती प्रक्रिया सफाई कामगार या पदाकरिता होणार असून उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे, भरतीचे इतर सर्व अधिकार मुंबई महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment