KDMC Bharti 2023 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती;अशी निवड केली जाणार

KDMC Bharti 2023 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी 11 डिसेंबर 2023 रोजी सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यासाठी नोकरीचे ठिकाण कल्याण असणार आहे. Kalyan Dombivli Municipal Corporation

या भरती प्रक्रियेमध्ये सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक, सेवानिवृत्त लेखाधिकारी, उपमुख्य लेखा परीक्षक इत्यादी पदांचा समावेश असून उमेदवारांनी मुलाखतीसाठी परिवहन मुख्यालय, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही त्यांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (KDMC Bharti 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज व आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीस आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment