Western Railway Bharti : पश्चिम रेल्वे मुंबई येथे विविध पदांसाठी 10 वी/12वी पासवर नोकरीची शेवटची संधी

Western Railway Bharti : पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ही भरती गट क आणि ड करिता होणार आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे, यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 10 नोव्हेंबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत. Railway Recruitment

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीसाठी 64 रिक्त जागा असून यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे, 10वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. किंवा ITI किंवा समतुल्य किंवा NCVT द्वारे प्रदान केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) आसने आवश्यक, तसेच 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण. किंवा मॅट्रिक उत्तीर्ण+ कोर्स पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवार. किंवा NCVT/SCVT द्वारे मंजूर मॅट्रिक + ITI उत्तीर्ण असावे,तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

यामध्ये अर्ज शुल्क सर्व उमेदवारांसाठी 500 रुपये तर अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/अपंग व्यक्ती/महिला/ अल्पसंख्यांक आणि आर्थिक मागासवर्ग इत्यादी करिता 250 रुपये इतके आकारण्यात आलेले आहे, सविस्तर जाहिरात वाचून उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Western Railway Bharti)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत, ऑफलाइन पोस्टाने किंवा कुरिअरने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment