NMPML Bharti 2023 : नाशिक महानगर परिवहन महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती;फी नाही आणि परीक्षा पण नाही

NMPML Bharti 2023 : नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित ( सिटीलिंक) अंतर्गत नाशिक येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक व पात्र वाराने 15 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

नाशिक महानगरपालिका शहर बस सेवा करिता कार्यरत नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत ही पदभरती घेतली जाणार आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादीची माहिती जाहिरातीमध्ये दिलेले आहे ही पदभरती एकवट मानधनावर मुलाखतीद्वारे घेतली जाणारा असून उमेदवाराची निवड कंत्राटी पद्धतीने केले जाणार आहे.

इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवाराने मूळ कागदपत्र सहित 15 डिसेंबर 2023 रोजी मुलाखतीला हजर राहावे या पदभरती मध्ये महाव्यवस्थापक (प्रशासन व तांत्रिक) हे एक पद भरले जाणार असून यासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ७५ हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.

सेवानिवृत्त अधिकारी असणाऱ्या उमेदवारासाठी ची भरती असून यासाठी शैक्षणिक पात्रता बी.टेक किंवा बीई (मेकॅनिकल ऑटोमोबाईल किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारास कमीत कमी सात वर्षाचा वाहतूक क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे असेल.

या अगोदर डेप्युटी जनरल मॅनेजर किंवा सरकारी वाहतूक सेवेमध्ये काम केलेल्या (NMPML Bharti 2023) असल्यास अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवाराची मुलाखत 15 डिसेंबर 2023 रोजी दुपारी एक वाजता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, सिटी लिंक, सिटी लिंक भवन, वीर सावरकर तरण तलाव समोर, त्रंबक रोड, नाशिक येथे घेतल्या जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचय पत्र (Bio-Data) सर्व आवश्यक कागदपत्राच्या साक्षांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, मूळ कागदपत्रे व त्यांचे छायांकित प्रती साक्षांकित करून वरील तारखेस वेळेवर उपस्थित राहावे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करण्यासाठी : येथे क्लिक करा

Leave a Comment