UCO Bank Bharti 2023 : युनायटेड कमर्शियल बँकेत 142 जागांसाठी तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी !

UCO Bank Bharti 2023 : युनायटेड कमर्शियल बँक अंतर्गत 142 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर 27 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असावे यामध्ये एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज महाव्यवस्थापक, UCO बँक, मुख्य कार्यालय, 4था मजला, H. R. M विभाग, 10, BTM सरानी, ​​कोलकाता, पश्चिम बंगाल-700 001 या पत्त्यावर 27 डिसेंबर 2023 पूर्वी सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा-01

ही भरती प्रक्रिया स्पेशलिस्ट ऑफिसर, मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II इत्यादी पदांवर होणार असून या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असणार आहे यामध्ये किमान CA/CFA/MBA(फायनान्स)/PGDM, B.E./B.Tech./B.Sc./M.Tech/M.E/ MBA/PGDM/PGDBM/MCA/LLB/CA/ पदव्युत्तर पदवी,पर्यंत आवश्यक आहे.यासाठी उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी अर्ज शुल्क जनरल/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांसाठी 800 रुपये तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा-02

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (UCO Bank Bharti 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment