Pune Mahanagarpalika Recruitment : पुणे महानगरपालिकेत 77 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती सुरू

Pune Mahanagarpalika Recruitment : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.उमेदवाराला दरमहा पगार 64551 ते 125000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. pune municipal corporation

उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी सदर जाहिरातीसोबत जोडलेला अर्ज भरून सोबत कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय मंगळवार पेठ येथे येथे परिपूर्ण कागदपत्रांसह आपल्या पदाच्या वेळापत्रकानुसार सदर दिवशी मुलाखतीच्या वेळेच्या 02 तास पूर्वी दुसरा,तिसरा,चौथा मंगळवार आणि महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 व जास्तीत जास्त 55 वर्षापर्यंत असावे. ही भरती प्रक्रिया 77 रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये प्राध्यापक (Professor), सहयोगी प्राध्यापक (Associate Professor), सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), वरिष्ठ निवासी (Senior Resident), कनिष्ठ निवासी (Junior Resident) इत्यादी पदांचा समावेश असणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Pune Mahanagarpalika Recruitment)

  • या जाहिरातीनुसार अर्ज घेऊन समक्ष मुलाखतीच्या दिवशीच उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचाच भरती प्रक्रियेसाठी विचार करण्यात येईल.
  • रिक्त पदांची संख्या कमी अथवा जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठीचे सर्व अधिकार माननीय अधिष्ठाता यांनी राखून ठेवलेले आहेत.
  • सदर जाहिरातीमधून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना सेवेमध्ये कोणताही कायम स्वरूपाचा हक्क सांगता येणार नाही.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार पुणे महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  • मुलाखतीच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी मुलाखत होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment