Panvel Mahanagarpalika Recruitment : पनवेल महानगरपालिकेत 12 वी पासवर स्टाफ नर्स व इतर पदांवर नवीन भरती सुरू, त्वरित अर्ज करा

Panvel Mahanagarpalika Recruitment : पनवेल महानगरपालिका, रायगड मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती स्टाफ नर्स व इतर पदांवर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असावे, यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 18000 ते जास्तीत जास्त 20000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे. panvel municipal corporation

यामध्ये उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण तसेच बीएस्सी नर्सिंग/ जीएनएम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत. उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल- 410206 या पत्त्यावर 11 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 पर्यंत पदानुसार सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया स्टाफ नर्स (महिला) (Staff Nurse Female), स्टाफ नर्स (पुरुष) (Staff Nurse Male), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष (Multipurpose Health Worker (MPW Male) इत्यादी पदांवर होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण पनवेल असणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार पनवेल महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment