AIASL Recruitment : AIASL मार्फत मुंबई येथे 828 जागांसाठी 10 वी पासवर मेगा भरती,कोणतीही परीक्षा नाही थेट मुलाखत होणार

AIASL Recruitment : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मार्फत मुंबई येथे 828 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे.या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी पास ते पदवीधारक असणे आवश्यक आहे. AIASL Mumbai Recruitment 2023

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे, तरी पात्र उमेदवारांनी GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई- 400099 या पत्त्यावर मुलाखतीसाठी 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 या तारखेला पदानुसार उपस्थित राहायचे आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया एकूण 828 रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये डेप्युटी मॅनेजर रॅम्प /मेंटेनेंस,ड्यूटी मॅनेजर-रॅम्प,ज्युनियर ऑफिसर टेक्निकल,रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव,यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर,ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर,ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर,ड्यूटी मॅनेजर-कार्गो,ड्यूटी ऑफिसर-कार्गो,ज्युनियर ऑफिसर-कार्गो,सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव,कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव इत्यादी पदांचा समावेश असणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01डिसेंबर 2023 रोजी 28 ते 55 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, यामध्ये SC/ST उमेदवारांना 05 वर्ष तर OBC उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे, यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून यामध्ये जनरल/ओबीसी उमेदवारांना 500 रुपये तर SC/ST/ExSM उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (AIASL Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील सोबत ठेवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment