East Central Railway Bharti 2023 : पूर्व मध्ये रेल्वेत तब्बल 1832 जागांसाठी 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उद्या शेवटची संधी

East Central Railway Bharti 2023 : पूर्व मध्य रेल्वेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती एकूण 1832 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी दहावी पास तसेच आयटीआय पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत, इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 09 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2023 रोजी कमीत कमी 15 वर्षे व जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे यामध्ये एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.उमेदवारांना अर्ज शुल्क जनरल/ओबीसी साठी 100 रुपये तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 50% गुणासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय(फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल)/ रेफ.& AC मेकॅनिक/फोर्जर & हीट ट्रीटर/कारपेंटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/पेंटर (G)/ इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/ग्राइंडर/टर्नर/ वायरमन/मेकॅनिक M.V/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/लॅब असिस्टंट/ ब्लॅकस्मिथ असणे आवश्यक) ही भरती प्रक्रिया अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) साठी होणार असून यामध्ये 1832 रिक्त जागा भरायच्या आहेत.

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पूर्व मध्य रेल्वे असून उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 09 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 पर्यंत सादर करायचे आहेत, यासाठी निवड पद्धती उमेदवारांनी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या संदर्भात तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाईल. Railway recruitment

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (East Central Railway Bharti 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने 9 डिसेंबर 2023 पूर्वी सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
अश्याच नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment