NHM Dharashiv (Osmanabad) Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव (उस्मानाबाद) मध्ये 12 वी ते पदवीधरांसाठी विविध पदांवर भरती सुरु

NHM Dharashiv (Osmanabad) Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव (उस्मानाबाद) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 15800 ते 30000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, खोली क्रमांक 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद. या पत्त्यावर दिनांक 08 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत. NHM Osmanabad Recruitment

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी शैक्षणिक पात्रता देखील पदानुसार वेगवेगळी असणार आहे,कमीत कमी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी पास असणे आवश्यक आहे, उमेदवाराने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी. या भरती प्रक्रियेमध्ये मागासवर्गीयांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क तर इतर उमेदवारांसाठी 150 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असावे.

ही भरती प्रक्रिया वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (पुरुष), वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (महिला), वैद्यकीय अधिकारी यूजी युनानी (आयुष), वैद्यकीय अधिकारी पीजी युनानी (आयुष), दंत शल्यचिकित्सक (दंतचिकित्सक), सामाजिक कार्यकर्ता (एनएमएचपी), स्टाफ नर्स (महिला), फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल वर्कर (कुष्ठरोग), सीटी स्कॅन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन, डेंटल हायजिनिस्ट, डेंटल असिस्टंट इत्यादी पदांवर 56 रिक्त जागांसाठी होणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (NHM Dharashiv (Osmanabad) Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून दिलेल्या पत्त्यावर पदानुसार अर्ज सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • अर्धवट भरलेले तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment