Nagpur Mahanagarpalika Recruitment : नागपूर महानगरपालिकेत 10 वी पास ते पदवीधारकांना 350 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !

Nagpur Mahanagarpalika Recruitment : नागपूर महानगरपालिकेत विविध पदांवर 350 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी दहावी,बारावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहे. ही भरती प्रक्रिया 350 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे, यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 19900 ते 122800 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. Nagpur Municipal Corporation

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी अर्ज 10 डिसेंबर 2023 पासून ते 27 डिसेंबर 2023 पर्यंत पदानुसार खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत, सविस्तर पदसंख्या तसेच शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. ही भरती प्रक्रिया सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, उपअग्निशमन अधिकारी, चालक/यंत्र चालक,फिटर कम ड्रायव्हर,अग्निशामक विमोचक इत्यादी पदांवर होणार असून

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 47 वर्षापर्यंत असावे, या भरती प्रक्रियेसाठी मागासवर्गीयांना 900 रुपये तर  इतर प्रवर्गासाठी 1000 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Nagpur Mahanagarpalika Recruitment)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कमीत कमी दहावी, बारावी ते पदवीधर उत्तीर्ण असावा.
  • उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, उमेदवार हा एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • जडवाहन चालविण्याचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या पदसंख्येत व प्रवर्गनिहाय आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

1 thought on “Nagpur Mahanagarpalika Recruitment : नागपूर महानगरपालिकेत 10 वी पास ते पदवीधारकांना 350 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !”

Leave a Comment