मराठी भाषा विभागात 10 वी पासवर शिपाई आणि ग्रंथपाल पदांसाठी भरती;ऑनलाईन अर्ज करा | Marathi Bhasha Vibhag Bharti

Marathi Bhasha Vibhag Bharti : मराठी भाषा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या भाषा संचालनालय मुंबई व विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाच्या स्थापनेवर गट क संवर्गातील कनिष्ठ ग्रंथपाल व गट ड संवर्गातील शिपाई हे रिक्त पदे सेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून 20 नोव्हेंबर 2023 पासून 11 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ची लिंक खाली उपलब्ध असून त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.

या पदभरतीमध्ये कनिष्ठ ग्रंथपाल आणि शिपाई ही दोन वेगवेगळी पदे आहेत त्यासाठी सरकारी नियमानुसार 15000 ते 69100 रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे. कनिष्ठ ग्रंथपाल या पदासाठी उमेदवार हा बारावी पास असावा तसेच ग्रंथालय शास्त्र या विषयातील पदविका किंवा पदवी धारण केलेल्या असणे आवश्यक असणार आहे, तर शिपाई या पदासाठी उमेदवारा दहावी पास असावा व वर दिलेल्या अर्हता 01 डिसेंबर 2023 पर्यंत धारण केलेले असणे आवश्यक आहे.Marathi Bhasha Vibhag Bharti

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सदर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज 22 नोव्हेंबर 2023 पासून 11 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये सादर करायचे आहेत अर्ज सादर करताना मागासवर्गीय,आर्थिक दुर्बल घटक, अनाथ तसेच दिव्यांग उमेदवारांना 900 रुपये एवढे परीक्षा शुल्क भरावे लागेल तर मागास उमेदवारांना 1000 रुपये एवढे ना परतावा परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित किंवा रद्द झाल्यास परीक्षा शुल्क उमेदवाराला परत करण्यात येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्या सूचना जाहिरातीमध्ये दिलेल्या असून उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचावे आणि त्यानंतरच अर्ज सादर करावेत.

अर्ज सादर करताना आवश्यक ते सगळे कागदपत्र व्यवस्थितरित्या स्कॅन करून भरावीत आणि ऑनलाईन पद्धतीनेच अर्जाच्या शुल्क अर्ज करते वेळेस भरणे बंधनकारक असेल, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरलेल्या उमेदवाराच्या बाबतीत कोणतेही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा त्यांना लेखी सूचना दिल्या जाणार नाही.

उमेदवाराने त्यांच्या उमेदवारांच्या संबंधित कोणत्याही प्रकारचा वशिला किंवा दबाव आणण्याचा किंवा गैरप्रकारचा अवलंब केल्यास त्याची उमेदवारी अपात्र ठरवण्यात येईल याची नोंद घ्यावी, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना दिलेल्या भ्रमणध्वनी व ईमेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत बदलू नये.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवाराने स्वतः घ्यावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment