Konkan Railway Recruitment : कोकण रेल्वेत विविध पदांसाठी 190 रिक्त जागांवर भरती सुरू

Konkan Railway Recruitment : कोकण रेल्वेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया 190 रिक्त जागांसाठी होणार असून त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 10 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 01 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्ष दरम्यान असावे, यामध्ये एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया पदवीधर अप्रेंटिस,जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस,टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस इत्यादी पदांवर होणार आहे.Railway Recruitment

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे कार्यक्षेत्र असून यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ओबीसी साठी 100 रुपये तर एससी/एसटी/इडब्ल्यूएस/ पीडब्ल्यूडी /अल्पसंख्यांक/महिला यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.ही भरती प्रक्रिया 10 डिसेंबर पर्यंत होणार असून उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच पदानुसार सादर करायचे आहेत.

यामध्ये शैक्षणिक पात्रता पदवीधर/टेक्निशियन/संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी पर्यंत असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Konkan Railway Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment