IB Recruitment : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 955 जागांसाठी मेगा भरती सुरु,त्वरित अर्ज करा

IB Recruitment : भारतीय गुप्तचर विभाग (इंटेलिजन्स ब्युरो)अंतर्गत विविध पदांवर 995 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पदानुसार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. ही पदभरती संपूर्ण भारतभर होणार असून उमेदवारांनी अर्ज 25 नोव्हेंबर 2023 पासून ते 15 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत. Intelligence Bureau recruitment

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार 44,900/- ते 1,42000/- इतका देण्यात येणार आहे. ही भरती असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव (ACIO-II/Exe) पदांवर तब्बल 995 जागांसाठी होणार असून उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत ऑफलाइन किंवा पोस्टाने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.(IB Recruitment)

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय 15 डिसेंबर 2023 रोजी, कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यामध्ये SC/ST – 05 वर्षे सूट तर OBC – 03 वर्षे सूट देण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क जनरल/इडब्ल्यूएस/ओबीसी 550 रुपये तर SC/ST/ExSM/महिला – 50 रुपये आकारण्यात आलेले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (IB Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत ऑफलाईन आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • या भरतीसाठी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून कमीत-कमी उमेदवाराची दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    भरतीचे इतर सर्व अधिकार कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment