Dr. Panjabrao Deshmukh Scholarship : 10 वी,12 वी नंतर “या” विद्यार्थ्यांना मिळणार 30000 रुपये, इथे करा ऑनलाईन अर्ज

Panjabrao Deshmukh Scholarship : महाराष्ट्र शासनामार्फत अधिकृत वेबसाईटवर महाडीबीटी द्वारे वेगवेगळ्या शिष्यवृत्ती जाहीर केलेल्या असतात या शिष्यवृत्तीची माहिती तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावरून मिळत असते. दहावीनंतरच्या शिष्यवृत्ती तसेच बारावीनंतर, पदवीधर, पदव्युत्तर साठी आणि बाहेर देशात शिक्षण घेण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येते.

तसेच अभियांत्रिकी च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्र सरकार 30000 पर्यंत रक्कम विद्यार्थ्याला देण्यात येते ही योजना आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना यांतर्गत अभियांत्रिकीच्या विद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आणि वस्तीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाने चालू केलेले आहे.

30000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

याचा लाभ म्हणून MMRDA,PMRDA, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर अशा शहरांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 हजार रुपये 10 महिन्यासाठी दिले जातात तर इतर एरियामध्ये 20000 रुपये दहा महिन्यासाठी दिले जातात. यासाठी उमेदवार हा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घरचा असावा किंवा मजूरवर्गातील असणे आवश्यक आहे.

ज्या पालकांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा अधिक असेल अशा पालकांच्या पाल्यांना MMRDA,PMRDA, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर शहरांमध्ये 10 हजार रुपये दहा महिन्यासाठी भत्ता दिला जातो तर इतर भागांमध्ये 8 हजार रुपये दहा महिन्यासाठी भत्ता दिला जातो.

30000 रुपयाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असेल तर येथे क्लिक करा

याकरिता पात्रता पाहिली तर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेच आहे, ज्या शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांच्याकडून बोनाफाईड सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी सादर करणे आवश्यक असेल.ज्या विद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे असे विद्यालय मान्यता प्राप्त असावे.

कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त मुले असू नये यासाठी (Panjabrao Deshmukh Scholarship)दहावी आणि त्याच्या पुढील मार्कशीट/प्रमाणपत्र अर्ज वेळेस सादर करायचे आहे. महाराष्ट्र राज्याचा अधिवास म्हणून तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र सादर करावे लागेल, जर मजूर किंवा अल्पभूधारक म्हणून तुम्ही अर्ज करणार असाल तर त्याचे प्रमाणपत्र सोबत जोडणे गरजेचे असेल.

आणि होस्टेलमध्ये राहत असलेल्या चे कागदपत्र सुद्धा तुम्हाला अर्ज सोबत जोडावे लागेल हे अर्ज तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या पोर्टल वर जाऊन करू शकता याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे जर तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल तर लगेच या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकता.

नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

2 thoughts on “Dr. Panjabrao Deshmukh Scholarship : 10 वी,12 वी नंतर “या” विद्यार्थ्यांना मिळणार 30000 रुपये, इथे करा ऑनलाईन अर्ज”

Leave a Comment