सरकारकडून या योजनेअंतर्गत मिळणार 3 लाख रुपये;असा करा अर्ज | Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा योजना लागू केली या योजनेमध्ये पारंपारिक कारागीर वास्तशिल्पकारगीरांना मोठी मदत मिळणार आहे.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत अश्या व्यावसायिकांना किंवा हस्त कारागिरांना 3 लाख रुपये एवढे कर्ज १८-30 महिन्याच्या परतफेडीवर दिले जाणार आहे. दोन टप्प्यांमध्ये या कर्जाचे वितरण केले जाणार आहे. पाच टक्के सवलत व्याज लाभार्थी कडून आकारला जाणारा असून आठ टक्के व्याज सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भरणार आहे.

विश्वकर्मा योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेचा लाभ सुतार, बोटनिर्माता, शस्त्र बनवणारे, लोहार, कुलूप बनवणारे, सुवर्णकार, कुंभार, शिल्पकार, मूर्तिकार, दगड फोडणारे, चर्मकार, गवंडी, पल्ली, चटई, झाडू विणकर, बाहुल्या आणि पारंपारिक खेळणी बनवणारे, नाभिक, पुष्पहार बनवणारे, परीट, शिंपी, मासेमारीचे जाळे बनवणारे या सर्व व्यावसायिकांना विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे.

कर्ज हमी शुल्क केंद्र सरकार उचलणार असल्यामुळे अर्जदारांना यांचा कोणताही ताण पडणार नाही पंतप्रधान मोदींनी 18 सप्टेंबर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 13000 कोटींची विश्वकर्मा योजना संपूर्ण भारतात लागू केलेली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी 13000 कोटी रुपयांच्या आर्थिक परिसीमेसह पीएम विश्वकर्मा या नवीन केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली होती.

विश्वकर्मा योजनांचे (PM Vishwakarma Yojana) उद्दिष्ट पारंपरिक कारागिर, हस्तशिल्प कारागिराद्वारे तयार केलेली उत्पादने आणि सेवांचे सहज उपलब्धत्ता आणि गुणवत्ता वाढवणे हे आहे.

विश्वकर्मा योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम विश्वकर्मा योजना लागू करताना व योजनेची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी कारागीर आणि हस्तक्षेप कारागिरांना जीएसटी नोंदणीकृत दुकानांमधूनच मेड इन इंडिया वस्तू खरेदी करण्याचे सांगितले.

तसेच लोकल फॉर वोकल या सरकारच्या संकल्पनेवर भर देत त्यांनी गणेश चतुर्थी, धनत्रयोदशी आणि दिवाळी या सणांमध्ये लोकांना स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले.

या योजनेमुळे स्थानिक कारागिरांना खूप मोठा हातभार लागणार असून या योजनेला अर्ज करायचा असेल तर वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहात, ऑनलाइन अर्ज चालू झाले आहेत.

नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment