pre matric scholarship : पुणे महानगरपालिकेमार्फत 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 15000 व 25000 एवढे अर्थसहाय्य देण्यात येत आहे, पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व सन 2023 मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 2023 मध्ये इयत्ता 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहा योजना अंतर्गत या अर्थसहाय्य देण्यात येत आहे.
एक शैक्षणिक वर्षासाठी हे अर्थसाह्य महानगरपालिकेकडून देण्यात येते इयत्ता 10 वी करिता 15000, बारावी करिता 25000 एवढे अर्थसहाय्य पुणे महानगरपालिका अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्याला दिल्या जाते. सदरच्या अर्थसहाय्य उपलब्ध रक्कम प्राप्त अर्ज याचा विचार करून देण्यात येणार आहे व इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत विविध नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर अर्ज फक्त ऑनलाईन मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज ची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद या शैक्षणिक योजनेसाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना सन 2023 म्हणजे फेब्रुवारी-मार्च या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये कमीत कमी 80 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
महानगरपालिका शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जर विद्यार्थी पुणे महानगरपालिकेचे शाळेतील असेल किंवा रात्र शाळेमध्ये शिकत असेल किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्या असेल तर 70 टक्के गुण आवश्यक आहे. 40% च्या पुढील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना, कचरा व्यवस्थापन, बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व संघटित कष्टकरी कामगाराच्या मुलांना किमान 65 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
सदरची शैक्षणिक योजना ही इयत्ता 10वी, 12वीनंतर शासनमान्य/विद्यापीठाकडून मान्यता मिळालेल्या संस्थेत प्रवेश घेतलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना आहे हे लक्षात घ्यावे. या योजनेसाठी 9 ऑक्टोबर 2023 ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज (apply pre matric scholarship) भरण्यात यावे.
29 डिसेंबर 2023 संध्याकाळी 5 वाजेनंतर सदर संकेतस्थळावरची लिंक बंद करण्यात येईल व अर्ज भरता येणार नाही अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा असल्यामुळे तुम्ही जर नोंदणी केलेली नसेल तर सर्वप्रथम तुमची नोंदणी करून त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्याकडे जपून ठेवावा.
महानगरपालिका शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांनी मागासवर्गीय कल्याणकारी योजना व खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी युवक कल्याणकारी योजना अंतर्गत अर्ज भरायचे आहेत. अर्ज पालकांच्या नावाने भरणे आवश्यक असेल विद्यार्थ्यांच्या नावाने हे अर्ज भरून नयेत संकेतस्थळावर नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्र स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे साक्षांकित किंवा झेरॉक्स केलेल्या प्रति अपलोड केल्या तर अर्ज बाद करण्यात येतील.
लाभार्थी CBSE/ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळा महाविद्यालयाकडून टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहणार आहे. अर्ज भरताना अर्जदाराने व्यवस्थित माहिती भरावी व अर्ज व्यवस्थित भरावा सदरचा अर्ज (Save as Draft) असाच ठेवला तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही सबमिट झालेलेच अर्ज फक्त पुणे महानगरपालिकेकडून विचारात घेतले जातील.
अर्ज सादर केल्यानंतर अर्जाच्या स्थितीबाबत लॉगिन करून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकतात तुम्ही दहावी किंवा बारावी मध्ये असाल आणि वरच्या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आत्ताच अर्ज सादर करा.
12th pass