Lek Ladki Yojana Maharashtra : मुलीचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणबाबत खात्री देण्यासाठी 01ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना लागू केली होती, सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरण करिता नवीन योजना लागू करण्याचे महाराष्ट्र शासनाने 2023 24 च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले होते.
मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आली असून पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थ्या मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली होती.
त्याला अनुसरून दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जाहीर केला असून ही योजना 30 ऑक्टोबर पासून लागू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती खाली दिलेल्या शासन निर्णयामध्ये उपलब्ध असून खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही शासन निर्णय व अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकणार आहात.
लेक लाडकी योजना शासन निर्णय व अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी काही अटी व शर्ती दिलेले आहेत त्या अटी शर्तीची पूर्तता तुम्हाला करण गरजेचं आहे. सदर योजनेअंतर्गत अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये, इयत्ता पहिलीत 6000 रुपये, सहावीत 7000 रुपये, अकरावीत 8000 रुपये तर लाभार्थी मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण 101000 एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला (Application Form Lek Ladki Yojana) अर्जाचा नमुना, लाभार्थ्याचा जन्माचा दाखला, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीच आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, संबंधित टप्प्यावरील लाभकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंतिम लाभाकरिता मुलाचा मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक असेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पर्यवेक्षिका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास आता सर्व प्रमाणपत्र सादर केलेला नसल्यास असा अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या पूर्तता करण्यासाठी अर्जदारास लेखिकळविणे आवश्यक असेल.
लेक लाडकी योजना शासन निर्णय व अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
त्याप्रमाणे अर्जदाराने एक महिन्यात कागदपत्राच्या पूर्ततेसह अर्ज दाखल करणे गरजेचे असून काही अपरिहार्य कारणास्तव अर्जदार या मदतीचा अर्ज दाखल करू शकला नाही तर त्याला वाढीव 10 दिवसाची मुदत देण्यात येईल, अशा प्रकारे जास्तीत जास्त दोन महिन्याच्या आत अर्ज दाखल करणे बंधनकारक असेल.
शासन निर्णयामध्ये कोणाच्या काय जबाबदाऱ्या असल्याच्या विषयी सुद्धा संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, ऑनलाइन पद्धतीने सेविका किंवा अधिकाऱ्यांना हे अर्ज अपलोड करणे बंधनकारक असेल, त्यानंतरच सदर अर्जदारास या योजनेचा लाभ मिळणार आहे. वर अर्जाचा नमुना तसेच संपूर्ण शासन निर्णय दिलेला असून संपूर्ण माहिती भरून या योजनेसाठी तुम्ही आत्ताच अर्ज करू शकता.