Tata Scholarship : टाटा कॅपिटल मार्फत 11 वी 12वी आणि पदवी मध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार ते बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असून यासाठी 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. जे विद्यार्थी 11 वी, 12 वी मध्ये मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून शिकत असतील असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी अर्जदारांना म्हणजे विद्यार्थ्यांना कमीत कमी 60% गुण दहावी मध्ये असण गरजेच आहे जर ते अकरावी मध्ये असतील आणि अर्ज करत असतील तर आणि जर बारावीत असतील तर अशा विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये 60% गुण मिळणे गरजेचे असेल.
विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न वार्षिक अडीच लाखापेक्षा जास्त असू नये जर जास्त असेल तर इतर असे उमेदवार अपात्र असतील. भारतातील संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती खुली असून कोणीही विद्यार्थी इतर अर्ज करू शकणार आहे. फीच्या 80 टक्के रक्कम टाटा कॅपिटल मार्फत देण्यात येते किंवा 10000 रुपये एवढी रक्कम टाटा कॅपिटल मार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येते.
टाटा कॅपिटल शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन पद्धतीने लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहात पदवीमध्ये ज्या उमेदवारांनी एडमिशन घेतले असेल त्यांच्यासाठी 12,000 एवढी रक्कम त्यांना मिळणार आहे15 नोव्हेंबर 2023 पर्यंत ते सुद्धा इथे अर्ज करू शकणार आहेत.
बीकॉम, बीएससी, बीए, डिप्लोमा/पॉलीटेक्निक याच्यामध्ये जरी मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलेल्या असेल तर असे अर्जदारांना येथे स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा मागच्या वर्षी कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असाव जास्त असू नये.
80 टक्के किंवा जास्तीत जास्त 12 हजार जे कमी रक्कम असेल ती रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे 2023-24 साठी ही शिष्यवृत्ती असून यासाठी उमेदवाराला आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, शाळेत ऍडमिशन घेतल्याची पावती, पैसे भरल्याची पावती, बँक अकाउंट च्या डिटेल्स, मागच्या वर्षीच्या गुणपत्रक, अपंग असतील तर अपंगत्वाचा दाखला लागणार आहेत.
टाटा कॅपिटल शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी साधी प्रोसेस आहे तुम्हाला वर लिंक दिलेली त्या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकणार आहात. टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत हे स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळणार आहे यासाठी तुम्हाला पहिले नोंदणी करावी लागेल.
नोंदणी केलेल्या असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉगिन करून अर्ज करू शकता, नोंदणी केली नसेल तर तुम्हाला लॉगिन करून नोंदणी करून अर्ज करावा लागेल त्यानंतर स्टार्ट अप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. जे सांगितलेल्या डिटेल सगळ्या भरायचे आहेत.
मागितलेल्या डॉक्युमेंट्स सगळ्या अपलोड करायचे आहेत आणि टर्म कंडिशन एक्सेप्ट करून Preview बटनाला क्लिक करायचं आहे. सगळी माहिती बरोबर भरली की नाही ते पाहायचं आणि त्यानंतर सबमिट करायचा आहे. जर तुम्ही इच्छुक असाल आणि तुम्हाला पण स्कॉलरशिप मिळावी अशी इच्छा असेल तर आत्ताच वर लिंक दिलेल्या आहेत त्या लिंक वर जाऊन आपल्या अर्ज सादर करा.