शेतकऱ्यांना दिवाळी बोनस “या” दिवशी मिळणार;नमो शेतकरी योजनेसाठी 1720 कोटी वितरित | Namo Shetkari Nidhi Yojana

Namo Shetkari Nidhi Yojana : महाराष्ट्र शासनाने 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे 6000 रुपयाची भर टाकून, राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांची मिळून एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची घोषित केले होते.

महाराष्ट्र मध्ये 2023-24 च्या अर्थसंकल्पात जारी केलेले या योजनेला “नमो शेतकरी महासन्मान निधी” असे नाव देण्यात आले. नमो शेतकरी महासन्माननिधी योजना घोषित केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

याचा शासन निर्णय 10 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाने जाहीर केला असून लाभार्थ्याला हे पैसे दिवाळीच्या अगोदर मिळावेत असा हेतू सरकारचा आहे. या शासन निर्णय अंतर्गत या योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना हे लाभ देण्यासाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक आणि लाभ देण्यासाठी एक असे दोन स्वतंत्र बचत खाते आयुक्त कृषी यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये उघडण्यासाठी शासन निर्णयात सांगितलेले आहे.

आयुक्त (कृषी), आयुक्तालय, पुणे यांच्या विनंतीला अनुसरून नमो शेतकरी महासंघांनी योजना अंतर्गत पहिल्या लाभ साठी एप्रिल ते जुलै चा हा हफ्ता असेल, त्यासाठी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्याची मागणी केली होती या मागणी अंतर्गत सदर कालावधीसाठी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे कोणाला मिळणार नाही ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा निधी ज्या शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री सन्मान निधी अंतर्गत खाते असतील आणि त्यांना लाभ मिळत असेल असे शेतकऱ्यांना या निधीचा पुरवठा दिवाळीच्या अगोदर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करणार आहे. संबंधित सर्व माहिती शासन निर्णयामध्ये सांगितलेली असून हा शासन निर्णय वर दिलेल्या लिंक वरून तुम्ही डाऊनलोड करून वाचू शकता.

कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही (Namo Shetkari Nidhi Yojana Status) याची सुद्धा माहिती दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही लिंक वरून पाहू शकता. या अगोदर जर तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान निधीचा हप्ता खात्यामध्ये दर चार महिन्याला जमा होत असेल तर नमो शेतकरी महासंघ निधी या योजनेचा हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंटला लवकरच जमा होणार आहे.

हे पैसे शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने 1720 कोटी एवढा निधी कृषी आयुक्त कडे वितरित केलेला आहे.

शेतीविषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment