CGTMSE Business Loan : छोट्या-मोठ्या व्यवसायांना मिळणार 5 कोटीपर्यंत विनातारण कर्ज, असा करा अर्ज

CGTMSE Business Loan : सूक्ष्म व लघु उद्योगांना भांडवल पुरवण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे यामध्ये सूक्ष्म व लघु उद्योगांना विनातारण भांडवल उभारणीसाठी क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस या योजनेची मर्यादा 2 कोटी वरून 5 कोटी करण्यात आली.

या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे या योजनेविषयी खूप कमी प्रमाणात लोकांना माहिती असल्यामुळे या योजनेची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे, हे कर्ज उद्योगासाठी विनातारण दिल्या जाते आणि याची लिमिट तब्बल 5 कोटीपर्यंत आहे त्यामुळे जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्ही या कर्ज साठी अर्ज करून ही रक्कम मिळवू शकणार आहात.

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे योजना

सूक्ष्म व लघु उद्योगांना विनाकारण भांडवल उभारणीसाठी सुरू केलेल्या क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस (CGTMSE Business Loan) योजनेची मर्यादा 2 कोटी वरून 5 कोटी करण्यात आली आहे ही योजना सूक्ष्म व लघु उद्योगांच्या वाढीसाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू करण्यात आली.

क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो आणि इंटरप्राईजेस (CGTMSE) अंतर्गत लघु व सूक्ष्म व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे त्यांना व्यवसाय करणे सोयीचे झाले आहे.

विना तारण कर्ज

पूर्वी बँकांकडून कर्ज घेताना कोणती तरी वस्तू किंवा जागा आपल्याला बँके कडे तारण ठेवणे आवश्यक होते, मात्र या नव्या धोरणानुसार उद्योग व्यवसायिकांना विनातारण 5 कोटीपर्यंत कर्ज मिळणार आहे.

5 कोटींचे कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे (CGTMSE Loan Limit)

योजनेचा अर्ज, कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, बिजनेस रिपोर्ट, सी जी टी एम एस सी लोन कव्हरेज पत्र, बँकेकडून घेतलेल्या कर्जाची कागदपत्रे, त्याचबरोबर ओळखपत्र, फोटो आणि बँक द्वारा इतर आवश्यक कागदपत्रे या कर्जासाठी लागणार आहेत.

या योजनेविषयी शहरांमध्ये पाहिजे तशी माहिती उपलब्ध नाही त्यामुळे जनजागृती करणे आवश्यक आहे अनेक जणांना या योजनेची माहिती नसल्यामुळे ते व्यवसायासाठी कर्ज घेणे टाळतात.

जर जनजागृती झाली तेव्हाच या योजनेला गती येऊन जिल्ह्यातील उद्योगांना बळकटी मिळू शकते मित्रांनो ही नवीन केंद्र सरकारची योजना सर्व सूक्ष्म लघु उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे ही माहिती तुमच्या उद्योजक बंधू भगिनींना नक्कीच शेअर करा.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment