Shabari Adivasi Gharkul Yojana : शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्जाचा नवीन नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी प्रसिद्ध, GR डाउनलोड करा

Shabari Adivasi Gharkul Yojana : राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबाची घरे कुठे मातीचे आहेत किंवा अनुसूचित जमातीची जी कुटुंबे बेघर आहेत असे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी 28.03.2013 च्या शासन शासन निर्णायान्वे 2013 पासून शबरी आदिवासी घरकुल योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

ही योजना राबवत असताना सगळे आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्जदाराने सादर करायचे कागदपत्र नमूद केलेले नाहीत तसेच या योजनेसाठी अर्जाचा नमुना सुद्धा उपलब्ध नाही त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाकडून वेगवेगळ्या नमुना मध्ये अर्जदाराकडून अर्ज किंवा वेगवेगळ्या कागदपत्राची मागणी करण्यात येते.

त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 8 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय पारित करून आवश्यक असलेल्या कागदपत्र आणि अर्जाचा नमुना शासन निर्णय सोबत जोडलेला आहे, या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कागदपत्राऐवजी शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी सोबत जोडलेल्या अर्जाचा नमुना व त्यामध्ये नमूद केलेले कागदपत्रे विहित करण्यात आले असून त्यानुसार अर्ज कागदपत्रे अर्जदाराकडून घेण्यात यावीत अशा सूचना दिल्या गेल्या आहेत .

शबरी घरकुल योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या व्यतिरिक्त अनेक कागदपत्राची मागणी अर्जदारांकडे करू नये तसं अर्जदारांना अर्जाचा नमुना (Shabari Adivasi Gharkul Yojana) साध्या कोऱ्या कागदावर लिखित भरून सादर केल्यास इथून अर्ज स्वीकारण्यात यावा अश्या सूचना विभागाकडून दिलेल्या आहेत.

अर्ज करण्यासाठी छापील अर्जाचा आग्रह धरण्यात येऊ नये सदर अर्ज व कागदपत्रे आदिवासी विकास विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या सर्व घरकुल ग्रामीण योजना साठी लागू राहणार आहे या सोबतच आवश्यक कागदपत्राची यादी सुद्धा दिलेली आहे.

शबरी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्राची यादी डाऊनलोड करा

वर दिलेल्या लिंक वरून तुम्ही आवश्यक कागदपत्राची यादी आणि अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता अर्जा सोबत तुम्हाला अलीकडच्या काळातल्या दोन पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, जमातीचे प्रमाणपत्र, सातबारा उतारा किंवा गाव नमुना आठ घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही याच्यासाठी, उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा, ग्रामसभेचा ठराव, शिधापत्रिका, आधार कार्ड आणि एक रद्द केलेला धनादेश.

एवढी कागदपत्र तुम्हाला फक्त अर्ज करतेवेळी जोडायचे आहे नमुना सुद्धा वर दिलाय तो नमुना डाऊनलोड करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment